छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला

May 13, 2016 5:34 PM0 commentsViews:

bhujbal discharge

13 मे :  महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे सुटकेसाठीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत(पीएमएलए) स्थापित विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज आज (शुक्रवारी) फेटाळून लावला.

भुजबळ काका-पुतणे सध्या न्यायालयीन कोठडीत असून छगन भुजबळ यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने भुजबळ यांना जामीन देणं शक्य नसल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे तुरूंगावासातून मुक्त होण्याची भुजबळांच्या आशा पुन्हा एकदा मावळल्या आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा