नाशिकमध्ये पुन्हा जळीतकांड, 6 बाईक जाळल्या

May 14, 2016 2:08 PM0 commentsViews:

ÖêËêÖê¸Ëü

14 मे :  नाशिकमध्ये पुन्हा एक जळीतकांड घडलं आहे. डीजीपी नगरच्या निल निलांजनी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 6 बाईक्स मध्यरात्री जळून खाक झाल्या आहेत.

तीन दिवसापूर्वीच या भागातील श्री अपार्टमेंटच्या पार्किंगमधील 6 बाईक्स जाळण्यात आल्या होत्या. या घटनेची पुनरुक्ती झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली असून नागरिकमधे भीतीचे वातावरण आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामकच्या गाड्या वेळेवर न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटने बाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात अजूनही यश आलेलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा