मुंबई गोवा महामार्गावर तीन ठिकाणी वाहतूक कोंडी

May 14, 2016 6:58 PM0 commentsViews:

sadasdk

14 मे :  मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी नऊ वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून सुट्टीसाठी मुंबईबाहेर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.

उरण-पनवेल बायपासवर आज सकाळच्या सुमारास अपघात झाला असून त्यात एक जण ठार झाला असल्याचं वृत्त आहे. या अपघातानंतरच वाहतूक कोंडी झाली असून अद्यापही मार्ग मोकळा होऊ शकलेला नाही. विकेण्डच्या निमित्तान कोकणाकडं जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असून त्यामुळं वाहतूक कोंडीत भरच पडली आहे. अक्षरश: मुंगीच्या पावलानं वाहतूक पुढं सरकत आहेत. महाडच्या दिशेने कोलाडपर्यंत तर पनवेलच्या दिशेने आपटा फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा