मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास मनाई

March 26, 2010 4:50 PM0 commentsViews: 3

26 मार्च मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी सरकारने दिली नाही, म्हणून शाळेने सुमारे 450 विद्यार्थ्यांना परीक्षेलाच बसू न दिल्याची घटना मुंबईत घडली आहे. चेंबूर येथील नारायण गुरू हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. 2003पासून सरकारने विनाअनुदानीत इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकणार्‍या विद्यार्थांची फी भरलेली नाही. शाळेची फी जास्त आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. या फीची रक्कम निश्चित करण्यासाठी सरकारने एका कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीचा अहवाल येईपर्यंत थांबा, अशी विनंती या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेला केली. पण शाळा व्यवस्थापनाने ही विनंती मान्य केली नाही. आणि विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास मनाई केली. याबाबत पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

close