वकिलांना हवी पिस्तुल बाळगण्याची परवानगी

March 26, 2010 4:56 PM0 commentsViews: 83

26 मार्चस्वसंरणक्षणासाठी वकिलांना पिस्तुल ठेवण्याची परवानगी मिळावी, असा ठराव मुंबई सेशन अँड सिव्हील कोर्ट बार असोसिएशनने केला आहे. सौजन्या जाधव आत्महत्याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांचे वकील राजेश बिंद्रा यांना काही दिवसांपूर्वी मारण्याची धमकी देण्यात आली होती. तशी तक्रार त्यांनी दाखल केली. पण त्यांना अजूनही पोलीस संरक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे जर पोलीस आम्हाला संरक्षण देऊशकत नसतील तर आम्हाला पिस्तुल ठेवण्याची परवानगी द्या, अशी मागणी बार असोसिएशनने केली. त्याबाबत केलेला ठराव आता सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवण्यात येणार आहे.

close