संशयीत दहशतवाद्यांना पोलीस कोठडी

March 26, 2010 5:04 PM0 commentsViews: 1

26 मार्चमुंबईत तीन ठिकाणी घातपाती कारवाया करण्याच्या आरोपावरुन एटीएसने दोन संशयीत दहशतवाद्यांना काही दिवसांपूर्वी अटक केली. या दोघांना एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अब्दुल लतिफ आणि रेहमान अशी या दोघांची नावे आहेत. एटीएसने 14 मार्चला त्यांना अटक केली. त्यांनी मुंबईत घातपात घडवण्यासाठी काही महत्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती, असा पोलिसांना संशय आहे. तसेच ते पाकिस्तानातील एका अंकलच्या संपर्कात होते. त्यांनी काही जणांना घातपात करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. हे दोघही गेल्या 12 दिवसांपासून एटीएसच्या कोठडीत आहेत.

close