एकनाथ खडसेंच्या निकटवर्तींना 30 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी अटक

May 14, 2016 9:56 PM0 commentsViews:

Eknath khadase

14 मे : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे निकटवर्ती असलेले गणेश पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. जमीन हस्तांतरासाठी 30 कोटींची मागणी केली होती.

पाटील याने खडसे यांचा पीए असल्याचे लोकांना भासवत होता. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात इंटरनॅशनल सोसायटी फॉर एक्सलन्स या सामाजिक व शैक्षणीक संस्थेने 2004 साली 37 एकर जमीन घेतली होती. मात्र, मंत्रालयाला लागलेल्या आगीत फाईल जळून खाक झाली. त्यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव हे अनेकवेळा मंत्रालयाचे खेटा मारत होते. त्यानंतर त्यांची ओळख गणेश पाटील याच्याशी झाली. पाटीलने जाधव यांना काम करण्यसाठी एक फ्लट आणि 1 कोटीची मागणी केली. तसंच याच्या चर्चेसाठी खडसेंच्या रामटेकच्या बंगल्यावर बोलावल्याचे समजले. दरम्यान हळूहळू त्यांच्या मागणीत वाढ करत जमीन हस्तांतरित करण्यासाठी 30 कोटींची मागणी केली.

मागणी प्रमाणाबाहेर गेल्यानंतर रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधककडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पाटीलला लाच मागताना अटक केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा