कळवा रेल्वे स्थानकात तरुणाला चालत्या ट्रेनमध्यून ढकललं, धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

May 14, 2016 10:23 PM0 commentsViews:

14 मे :  मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या लोकलमधून एका तरुणाला बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कळवा रेल्वे स्थानकात घडली आहे. हा सर्वप्रकार रेल्वे स्टेशन इथल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाला आहे.

अपघात झाल्यानंतर रेल्वे फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाश्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण लोकलने स्पीड पकडल्याने हा तरूण लोकल खाली आला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला जेजे रुग्णालयात दाखल करे पर्यंत तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
êËÖêêËêÖêËêÖêêËÖêy

या संदर्भात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र सीसीटीव्हीच्या दृश्यात हा अपघात नसून त्याला बाहेर फेकण्यात आल्याचे दिस्लामुळे आता पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. हा युवक हा उत्तरप्रदेश येथील बलरामपुर मधील फगुड्या या गावातील आहे. त्याच्या जवळील आधार कार्ड वरून त्याची ओळख पटली आहे. आता या सर्व प्रकारामागे कोणते कारण आहे, याचा शोध ठाणे रेल्वे पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फूटेजनंतर या प्रकरणात नव्याने गुन्हा नोंदवला जावू शकतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा