मान्सूनचं आगमन लांबणीवर, 7 जूनला केरळमध्ये होणार दाखल

May 15, 2016 2:17 PM0 commentsViews:

Monsoon india

15 मे :   यंदा मॉन्सूनचं केरळमधलं आगमन लांबणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा केरळच्या किनार्‍यावर मॉन्सूनचे आगमन 7 जूनला होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, अंदमान आणि निकोबारमध्ये मंगळवारपर्यंत मॉन्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा त्यापुढील प्रवास संथ गतीने होण्याची शक्यता आहे.

मंगळवारपर्यंत अंदमानात जोरदार पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या देशातील काही भागांत पूर्वमोसमी पाऊस पडत आहे.

मॉन्सून सर्वसाधारणपणे 20 मे रोजी अंदमानात दाखल होतो. यंदा तो नेहमीच्या वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच दाखल होण्याची चिन्हे आहेत. अंदमानपाठोपाठ 25 मे रोजी श्रीलंकेत आणि एक जूनला केरळात मॉन्सून दाखल होतो. पण, यंदा त्याला उशीर होण्याचा अंदाज आहे. मॉन्सूनच्या आगमनाच्या सर्वसाधारण तारखा आणि त्याची यंदाच्या वाटचालीचा विचार करता मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमनही लांबणार असल्याचे चित्र आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा