विठुरायाच्या दर्शनासाठीही पैसे

March 27, 2010 7:25 AM0 commentsViews: 6

27 मार्चशिर्डीनंतर आता पंढरपुरातही श्री विठ्ठलाच्या स्पेशल दर्शनासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. विठ्ठलाचे दर्शन ज्यांना तातडीने घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी 200 रूपये तर 410 रूपयांमध्ये होणार्‍या विठ्ठलाच्या महापुजेसाठी आता 3,100 रूपये मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आधी होणार्‍या मोफत काकड आरतीसाठीही 1000 ते 10,000 रूपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. मंदिर समितीच्या या निर्णयाला वारकरी विरोध करत आहेत. मंदिर समिती विठुरायाच्या भाविकांमध्ये श्रीमंत आणि गरीब असा भेदाभेद करत आहे, असा आरोप आता भाविकांमधून होत आहे.

close