मोदी एसआयटीसमोर हजर

March 27, 2010 7:35 AM0 commentsViews: 2

27 मार्चगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी 2002नंतर पहिल्यांदाच आज स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमसमोर हजर झाले आहेत. एसआयटीने त्यांची चौकशी सुरू केली आहे. गुलबर्ग सोसायटीत झालेल्या जाळपोळ प्रकरणी त्यांची ही चौकशी होत आहे. 2002 मधील गुजरात दंगलीत काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या घरावर दंगलखोर धडकले. त्यावेळी जाफरी यांनी बचावासाठी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अनेकदा फोन केला. पोलीस पाठवण्याची विनंती केली. मात्र मोदी यांनी त्यांची विनंती मान्य केली नाही. आणि फोन कट केला. उलट त्यांना अपशब्द वापरले असा दावा जाफरी यांच्या पत्नीने केला होता. या तक्रारीच्या आधारे SIT ने चौकशीसाठी मोदी यांना बोलावले आहे.या चौकशीत मोदींना पुढील प्रश्न विचारण्यात आले…27 फेब्रवारीला ज्या दिवशी गोध्रा दंगल झाली त्या दिवशी वरीष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली का? दंगेखोरांवर कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या का?दंगल सुरू असताना कुठल्या मंत्र्याला पोलीस कंट्रोल रूममध्ये बसण्याचे आदेश दिले का?गुलबर्ग सोसायटीवर हल्ला झाला तेव्हा माजी काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांचा फोन मुख्यमंत्र्यांच्याऑफिसमध्ये आला होता का?

close