मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

May 15, 2016 12:49 PM0 commentsViews:

Mumbai goa highway accident

14 मे : रायगडमधील इंदापूरजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर शिवनेरी बस आणि मारुती कारमध्ये हा अपघात झाला आहे.

भरधाव वेगात असलेल्या शिवनेरी बसने समोरुन येत असलेल्या मारुती कारला जोरदार धडक दिली. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. एसटीतील एका प्रवाशाचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 पुरुष, 1 महिला आणि 1 चिमुरड्याचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एसटीच्या पुढील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा