इतर दोषींवर कारवाई करा नाहीतर ठिय्या आंदोलन करू, तृप्ती देसाईंचा इशारा

May 16, 2016 12:33 PM0 commentsViews:

16 मे :  मंदिरांच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलने करणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील गाभारा प्रवेशावेळी मारहाण करणार्‍या इतर 30 ते 35 संशयितांवर आठ दिवसात कारवाई करा अन्यथा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.

trupti desai12

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्या महिला सहकार्‍यांसह 13 एप्रिलला अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश केला होता. गाभारा प्रवेशावेळी काही श्रीपूजकांसह हिंदत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तृप्ती देसाईंना मारहाण केली होती. मारहाण करणार्‍या सातजणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, मात्र मंदिरातील सीसीटीव्हीत दिसणार्‍या इतर 30 ते 35 जणांवर अजूनही कारवाई केलेली नाही. त्या सर्वांवर तातडीने कारवाई करा अन्यथा आठ दिवसांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात ठिय्या आंदोलन करु असा इशारा दिला आहे. पोलिसांनी केलेली कारवाई ही केवळ दाखवण्यासाठीच होती. पोलिसांनी एकदाही फोन करून याबाबत विचारणा केली नाही त्यामुळे कारवाईवर असमाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा