राहुल राज प्रकरणी पोलिसांना क्लिन चीट

March 27, 2010 7:46 AM0 commentsViews: 1

27 मार्चराहुल राज प्रकरणात मुंबई पोलिसांना क्लिन चीट दिली गेली आहे. 27 ऑक्टोबर 2008 रोजी राहुल राज पोलिसांच्या गोळीबारात कुर्ला इथे मरण पावला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याचे त्यावेळचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची समिती नेमली गेली होती. राहुल राज याच्यावर गोळ्या झाडण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण तो अधिक हिंसक होत चाललेला होता. तो 'मै राज ठाकरे को मारना चाहता हूँ…मुझे पुलीस कमिशनरसे बात करनी है..' असे बोलत होता. याचा अर्थ तो काही विशेष उद्देश ठेवूनच आलेला होता…त्यामुळेच त्याच्याबद्दल तात्काळ कारवाई करणे गरजेचे होते….अस जोसेफ समितीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सरकारला सादर केलेला हा अहवाल 'आयबीएन-लोकमत'ला मिळाला आहे.

close