आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी ?

May 16, 2016 7:05 PM0 commentsViews:

Aanandi Ben patel123

16 मे : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढच्या वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून भाजपाला या राज्यातील सत्ता गमावणं परवडणार नाही. त्यामुळे आनंदीबेन पटेल यांच्या जागी गुजरातचेच आरोग्यमंत्री नितीनभाई पटेल यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर, आनंदीबेन पटेल यांना गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला होता. मात्र पक्षांतर्गत धुसफूस रोखण्यात आनंदीबेन पटेल यांना अपयश आल्याचं सांगितलं जातं आहे. तसंच गुजरातमध्ये पटेल समुदायाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनानंतरच भाजपाचे मुख्य नेतृत्व राज्याचा मुख्यमंत्री बदलण्याचा विचार करत होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, आनंदीबेन पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांना पंजाबचे राज्यपाल बनवण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा