भीषण दुष्काळातही बीड जिल्ह्यातील तिंतरवनी गाव झालं टँकरमुक्त

May 16, 2016 4:25 PM0 commentsViews:

 शशी केवडकर, बीड

16 मे : गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात आणि खासकरून बीडमध्ये भीषण दुष्काळ आहे. घागरभार पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत असताना बीडतील तिंतरवनी गाव मात्र याला अपवाद ठरलं आहे. मे महिन्याच्या मध्यावर हे गाव चक्क टँकरमुक्त झालं आहे. तिंतरवनीच्या गावकर्‍यांनी हे कसं शक्य करून दाखवलं आहे

beed tanker mukta
सैराटमध्ये परशा आणि आर्ची जशी सैराट होऊन पोहत होती. तसंच हे तरुणही या विहिरीत “सैराट” होईन पोहताहेत. आता तुम्हाला वाटेल की ही कोणत्यातही बागायती पट्ट्यातली विहिर असेल. मात्र तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. कारण ही पाण्याने भरलेली विहीर आहे दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातल्या तिंतरवनीमधली.

या गावानं जलसंधारणाची कामं केली आणि एका वळवाच्या पावसातच या गावातली पाणीटंचाई गायब झाली. जलसंधारणाची कामं आणि पाण्याचं व्यवस्थापन यामुळे तिंतरवनीच्या पाचवीला पूजलेली पाणीटंचाई एका वळवाच्या पावसात नाहीसा झाली. एका वळवाच्या पावसानं विहिरी, हातपंप यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली.

पाणी व्यवस्थापनासाठी शेतीच्या मोटर काढून घेण्यात आल्या. सुरूवातीला यासाठी काही प्रमाणात विरोध झाला. मात्र जेव्हा गावकर्‍यांना समजावून सांगीतलं तेव्हा गावकर्‍यांनी मोठं सहकार्य केलं. याचाच परिणाम म्हणून मे महिन्यात एवढ्या दुष्काळात नळाला पाणी येताना दिसतंय आणि त्याचा आनंद गावकर्‍यांना लपवता येत नाही आहे

जलसंधारणाची कामं केल्यानं एका वळवाच्या पावसात गावात पाणीच पाणी झालं. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही ही तुमच्या गावात जलसंधारणाची कामं करा आणि दुष्काळावर मात करा असं आवाहन तुम्हाला आबीएन लोकमत करतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा