हेमंत करकरेंच्या तपासावर शंका घेणं अयोग्य – शरद पवार

May 16, 2016 10:52 PM1 commentViews:

sharad pawar 21

16 मे :  मालेगाव बॉम्बस्फोट तपासप्रकरणी अचानक भूमिका बदलल्याने एनआयएच्या तपासामुळे विश्वासार्हतेला धक्का बसला आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते सोमवारी अहमदनगरमध्ये बोलत होते. यावेळी एनआयएच्या तपासावर जोरदार टीका केली आहे. शहीद हेमंत करकरे यांनी अतिशय मेहनतीनं या प्रकरणाचा तपास केला होता. त्यांच्या तपासावर शंका घेणं, हे योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसने प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहितांना तपासाअंती दोषी ठरवलं होतं. मात्र शहिद हेमंत करकरे यांनी केलेल्या या तपासाला राष्ट्रीय तपास संस्थेने चुकीचे ठरवल्याने मालेगाव स्फोटातील आरोपींना क्लिनचिट मिळाली आहे. एनआयएच्या तपासामुळे विश्वासार्हतेला धक्का बसला. हे योग्य नाही. निरपराधांची हत्या झाली. अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती ‘जुम्मा’च्या दिवशी मशिदीत कधी हल्ला करेल, हे शक्य नाही. मी अजूनपर्यंत हे पाहिले नाही, असं पवार यांनी म्हटले आहे.

एनआयने काही दिवसांपूवच् या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना क्लीन चीट दिली. याशिवाय, अन्य आरोपींवरील मोक्काही एनआयएकडून काढून टाकण्यात आला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • amit

    पवार साहेब NIA असा कुठेच म्हटलं नाहीये कि अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती ने हा हल्ला केला आहे म्हणून ..प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना क्लीन चीट दिली म्हणजे” हिंदू आतंकवाद ” हा जो नवीन शब्द जन्माला आला तो अस्तित्वात नाहीये हे सिद्ध झाल आणि आतंकवाद आणि दहशत वाद याला जात धर्म नसतो असे कोण बोलले होते ?