हाजी अली दर्गा सुरक्षेबद्दल चिंता

March 27, 2010 7:51 AM0 commentsViews: 105

27 मार्चहाजी अली दर्गा सुरक्षेबद्दल विश्वस्त मंडळाने चिंता व्यक्त केली आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी विश्वस्त मंडळ आणि सभासदांच्या वतीने त्यांचे वकील विभव कृष्णा यांनी मुंबई पोलिस आयुक्त डी. शिवानंद यांना पत्र लिहिले आहे. देशातील धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहेत. त्यातच हाजी अली हे खुले असल्याने समुद्राच्या बाजूने दहशतवादी दर्ग्याला लक्ष्य करू शकतात. त्यामुळे इथे सुरक्षेची अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

close