पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

May 17, 2016 8:59 AM0 commentsViews:

petrol_price_hike

17 मे : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 0.83 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 1.26 रुपये प्रति लिटर महागलं आहे. काल (सोमवारी) मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

याआधी 30 एप्रिलला दरवाढ करण्यात आली होती. तेव्हा पेट्रोल 1.06 रुपये प्रति लिटर, आणि डिझेल 2.94 रुपये प्रति लिटर महागलं होतं. अवघ्या 15 दिवसात पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आल्यानं वाहनचालकाच्या खिशाला महिनाभरात दुसर्‍यांदा कात्री बसणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा