वीरप्पननं रचला होता सुपरस्टार रजनीकांतच्या अपहरणाचा कट -राम गोपाल वर्मा

May 17, 2016 9:45 AM0 commentsViews:

veerapan kidnap rajnikanth3

16 मे :  कर्नाटकच्या जंगलातील चंदन तस्कर वीरप्पन यानं तामिळ सिनेमाचा सुपरस्टार रजनीकांत यांचं अपहरण करण्याचा कट रचला होता, असा सनसनाटी खुलासा दिग्दर्शक राम गोपालल वर्मा याने केला आहे.

वीरप्पनच्या आयुष्यावर आधारीत ‘वीरप्पन’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शिन केलं आहे. या सिनेमासाठी संशोधन करताना आपल्याला ही माहिती मिळाल्याचं राम गोपाल वर्माने म्हटलं आहे.

वीरप्पनने कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचंही अपहरण केलं होतं. त्याच धर्तीवर त्याला रजनीकांतचं अपहरण करायचं होतं. पण सुदैवानं ते शक्य झालं नाही, असं रामू म्हणाला.

वीरप्पनने तामिळनाडूमधल्या एका फार्महाऊसवरुन राजकुमार यांचं अपहरण केलं होतं. ते जवळपास 108 दिवस वीरप्पनच्या ताब्यात होते.

राम गोपाल वर्माचा वीरप्पन हा सिनेमा येत्या 27 मे रोजी देशभरात प्रदर्शित होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा