ठाणे विधान परिषदेत शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर

May 17, 2016 12:05 PM0 commentsViews:

ravindra pathak thanejpg

17 मे : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे रिंगणात आहेत. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीचे वसंत डावखरे विरुद्ध सेना-भाजप युतीचे रवींद्र फाटक अशी लढत रंगतदार होणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यापार्श्वभूमीवर सेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव निश्चित करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी काल (सोमवारी) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर युतीचे उमेदवार म्हणून रवींद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या दिवशी शिवसेनेकडून नाव जाहीर करण्यात आलं. फाटक हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

ठाणे विधानपरीषद निवडणुक

पक्षीय बलाबल – युतीची ताकद
शिवसेना – 311 `
भाजप – 180
एकूण – 491

पक्षीय बलाबल- आघाडीची ताकद

राष्ट्रवादी काँग्रेस – 199
काँग्रेस – 103
बहुजन विकास आघाडी – 119
एकूण – 421

पक्षीय बलाबल- इतर

अपक्ष – 48
मनसे – 20
सप – 17
आरपीआय – 8
बसप – 5
कोणार्क विकास आघाडी – 7
सेक्युलर अलायन्स ऑफ इंडिया – 4
एमआयएम – 1
सीपीएम – 5
एकुण – 119


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा