रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पदावरून हटवा- सुब्रमण्यम स्वामी

May 17, 2016 1:43 PM0 commentsViews:

collage_647_103115055556

17 मे : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची तातडीने पदावरून हटवा, या मागणीसाठी भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. भारताच्या खराब अर्थव्यवस्थेला राजनच जबाबदार असून राजन आपल्या धोरणांनी जाणीवपूर्वक देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान करत असल्याचा गंभीर आरोप स्वामी यांनी पत्रामध्ये केला आहे. राजन यांनी व्याजदार कमी केले नाहीत म्हणून अर्थव्यवस्था गटांगळ्या खातेय, असा आरोपही स्वामींनी केला आहे.

रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा पदभार देऊ नका किंवा त्यांना तातडीने पदावरून हटवा, असं स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. रघुराम राजन हे भारतीयांप्रमाणे विचार करत नाहीत, त्यांचं मन हे भारतीय नाही असं म्हणत त्यांनी राजन यांच्यावर हल्ला चढवला. रघुराम राजन हे त्यांचे अमेरिकेचे ग्रीनकार्ड नेहमी रिन्यू करत राहतात याचाच अर्थ ते अद्याप मनाने पूर्ण भारतीय नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वामी सतत राजन यांच्यावर टीका करत आहे. पण यावर राजन यांची प्रतिक्रिया मात्र आलेली नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा