बच्चन, मुख्यमंत्री एकत्र नाहीत

March 27, 2010 8:28 AM0 commentsViews: 3

27 मार्चअखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अमिताभ बच्चन संदर्भात काँग्रेस हायकमांडने दिलेला सल्ला पाळला आहे. मुख्यमंत्री चव्हाण उद्याऐवजी आजच साहित्य संमेलनाला भेट देणार आहेत. त्यामुळे उद्या समारोपाच्या वेळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत उपस्थित राहण्याचे मुख्यमंत्र्यानी टाळले आहे. वांद्रे- वरळी सी लिकंलच्या उद् घाटनाला बच्चन यांना बोलावल्यानंतर हाय कमांडने मुख्यमंत्र्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 'आयबीएन-लोकमत'ने पहिल्यांदा ही बातमी दिली होती. ती खरी ठरली आहे. मुख्यमंत्री आज ग्रंथ प्रदर्शनाला भेट देणार आहेत. याखेरीज मुख्यमंत्री परिसंवादामध्येही हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा छोटेखानी सत्कारही आयोजक करणार आहेत.

close