एकनाथ खडसेंच्या जावयाची लिमोझिन अवैध, अंजली दमानियांचा आरोप

May 17, 2016 3:54 PM1 commentViews:

êÖêËêÖêêËÖêy

17 मे :  राज्याचे अल्पसंख्य विकास आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेलवलकर आता वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. खेलवलकर यांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान गाडी अवैध असून ती जप्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

दमानिया यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. खडसेंच्या जावयाची लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. भाजप सरकार एकनाथ खडसेंच्या जावयाची ही अवैध सोनाटा लिमोझिन कार जप्त करणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

मुद्दा असा आहे की तुलनेनं छोट्या असलेल्या गाडीचा विस्तार केला गेला, पण हे करताना आरटीओची परवागनी घेतली नाही, असा आरोप दमानियांनी केला आहे. यामुळे खडसे स्वत: जरी अडचणीत येणार नसले, तरी जावयाच्या गाडीमुळे त्यांचं नाव मात्र नक्कीच चर्चेत आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Aanand P

    kay bai marlas tond tu madhe.