35 गावांचा निर्णय आठवडाभरात

March 27, 2010 8:47 AM0 commentsViews: 3

27 मार्च वसई-विरार महापालिकेतून 35 गावे वगळण्याचा निर्णय आठवडाभरात जारी करणार असल्याचे सरकारने हायकोर्टात सांगितले आहे.राज्यसरकारने 35 गावे महापालिकेतून वगळण्याची घोषणा विधानसभेत केली होती. याकडे विवेक पंडित यांच्या वकिलांनी लक्ष वेधले.हायकोर्टाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला याबाबत विचारणा केल्यानंतर राज्य सरकारने हायकोर्टाला ही माहिती दिली. तर राज्य निवडणूक आयोगाने याबाबत राज्यसरकारकडून माहिती घेऊ असे आश्वासन कोर्टाला दिले. त्यामुळे सरकार नक्की किती गावे वगळणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

close