‘नीट’चा ‘पेपर’ आता पंतप्रधानांकडे !

May 17, 2016 4:50 PM0 commentsViews:

cm meet pm modi417 मे : सुप्रीम कोर्टात ‘नीट’ची ‘परीक्षा’ नापास झाल्यानंतर राज्य सरकारने आता केंद्राकडे धाव घेतलीये. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या भेट घेणार आहे. या भेटीत ‘नीट’वर काही तोडगा निघतो का हे पाहावं लागणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नीटची परीक्षा लागू करण्यात आलीये. 1 मे रोजी पहिला पेपरही झालाय. जुलै महिन्यात दुसरी परीक्षा होणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारसह देशातील 8 राज्यांनी नीट रद्द करावी या मागणीसाठी फेरविचार याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने याचिका फेटाळून लावल्यात. आणि ‘नीट’ द्यावीच लागेल असे आदेश दिले. कोर्टाची पायरी न चढल्यामुळे राज्य सरकारची नाचक्की झालीये. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातल्या पालकांची भूमिका ते मोदींना सांगणार आहेत. त्याचबाबत महाराष्ट्रातली वैद्यकीय प्रवेशाची प्रक्रिया, पार पडलेली सीईटी, या सगळ्याबद्दल मुंख्यमंत्री पंतप्रधांना माहिती देणार आहे. याच आठवड्यात सोमवारी नीटबाबत नवी दिल्लीत महत्त्वाच्या बैठका झाल्या होत्या. केंद्र सरकारनं अध्यादेश काढला, तरच यावर्षी नीट परीक्षा टाळता येईल, असं दिसतंय. पण त्यावर अजून निर्णय झालेला नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा