कोर्टाच्या लढाईत सुशीलकुमार ‘चितपट’, रिओचं तिकीट आता कुस्ती फेडरेशनच्या हाती

May 17, 2016 5:21 PM0 commentsViews:

sushil-kumar-wrestling17 मे : पैलवान सुशीलकुमारनं दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. भारतीय कुस्ती फेडरेशनशी बोलून वाद मिटवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

रिओच्या तिकीटासाठी महाराष्ट्राचा नरसिंग यादव आणि सलग दोन ऑलिम्पिकचा पदकविजेता सुशील कुमार या दोघांमध्ये सध्या चढाओढ सुरू आहे. रिओ ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी महाराष्ट्राच्या नरसिंग यादवशी आपली चाचणी कुस्ती खेळवण्यात यावी या मागणीसाठी सुशीलकुमारने याचिका दाखल केली होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व नरसिंग यादव करणार की सुशीलकुमार याचा निर्णय आता भारतीय कुस्ती फेडरेशन घेणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा