निलेश राणेंना 23 मेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे कोर्टाचे आदेश

May 17, 2016 6:00 PM0 commentsViews:

nilesh rane newsरत्नागिरी – 17 मे : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत मारहाण प्रकरणी अटकेसाठी धावाधाव करणारे काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांना अखेर कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. कोर्टाने 23 मे पर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहे.

मेळाव्याला आला नाही म्हणून निलेश राणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संदीप सावंत यांना अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी निलेश राणेंविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

निलेश राणे यांच्या चार सहकार्‍यांना अटक करण्यात आली असून कोर्टाने त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावलीये. निलेश राणे यांनी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली.

आता निलेश राणेंकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय. त्यांना 23 तारखेपर्यंत आत्मसमर्पण करण्यास कोर्टानं सांगितलं आहे. त्यामुळे याप्रकरणी आता निलेश राणे आत्मसमर्पण करता का नाही हे पाहण्याचं ठरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा