बीआरटीचा उडाला बोजवारा

May 17, 2016 9:26 PM0 commentsViews:

17 मे : पुण्यातील नगर रोड बीआरटी नव्यानेच सुरू करण्यात आलीये. गेल्या चार वर्षांपासून हा मार्ग पडूनच होता. मात्र अनेक तांत्रिक अडचणी असताना देखील हा मार्ग घाईत सुरू केल्याने अनेक अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी बॅरिकेटस नाहीत,बस स्टॉपमधील अंतरही जास्त आहेत. यामुळे जीव धोक्यात घालून सर्रास बीआरटी मार्गातूनच रस्ते ओलांडले जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा