अवयव दात्यांचा गौरव

March 27, 2010 8:58 AM0 commentsViews: 32

अलका धुपकर, मुंबई27 मार्च आज अवयव दात्यांचा गौरव दिन आहे. राज्यात अवयव दान करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करणारा आज दिवस. राज्यात सध्या सर्वाधिक गरजेचा अवयव आहे, किडनी. नातलग किडनी दान करायला तयार असतात. पण वैद्यकीय कारणांमुळे ते किडनी दान करु शकत नाहीत, तेव्हा दोन नातलग या दानाची अदलाबदल करु शकतात. याबद्दलच 'स्वॅप' नावाची एक डॉक्युमेंटरी बनवण्यात आली आहे.अवयव दान करायची इच्छा असेल पण केवळ वैद्यकीय कारणांमुळे हे दान होत नसेल तर अवयवदानाचे स्वॅपिंग करता येते, हे स्वॅप या डॉक्युमेंटरीतून दाखवण्यात आले आहे. तुमच्याकडे अवयवदाता तयार असेल तर दोन किंवा त्याहून अधिक पेशंटमध्ये ही अदलाबदल करता येते. स्थानिक हॉस्पिटलला या शस्त्रक्रियेची परवानगी वैद्यकीय संचालनालयाकडून घ्यावी लागते.नातलग नसलेल्या दोन व्यक्तींमध्ये अवयवदानाचं हे स्वॅपिंग करता यावे यासाठी आता 1994 च्या अवयव दान कायद्यामध्येही बदल केले जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने संसदीय समितीची स्थापना केली आहे.बेकायदेशीपणे होणार्‍या अवयव विक्रीला आळा घालून अवयवदानाची गरज पूर्ण करु शकणारे हे स्वॅप डोनेशन वैद्यकीय क्षेत्रासाठी क्रांतीकारक ठरणार आहे.

close