विद्यार्थी सेनेचा राडा

March 27, 2010 9:42 AM0 commentsViews: 1

27 मार्चपुण्यातील चिंचवड स्टेशन येथील पुणे इन्स्टिट्यूट ऑफ ऐरोनॉटीकल्स ऍन्ड कॉम्प्युटर सायन्समध्ये भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज गोंधळ घातला. या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण व्यवस्थित मिळत नसल्याचा आरोप पालकांनी केला होता. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी इन्स्टिट्यूटच्या स्टाफला मारहाण केली. इथे सुमारे 150 विद्यार्थी शिकतात. इथे मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, मरीन आणि ऐरोनॉटीकल्सचा अभ्यासक्रम शिकवला जातो.विद्यार्थ्यांकडून भरमसाट फी घेऊनही शिक्षण व्यवस्थित मिळत नसल्याची तक्रार पालकांनी विद्यार्थी सेनेकडे केली होती. अखेर याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्टाफला मारहाण केली आणि इन्स्टिट्यूटला टाळे ठोकले.

close