पंतप्रधानांचं राज ठाकरेंना भेटीचं निमंत्रण, जूनमध्ये भेट होण्याची शक्यता

May 17, 2016 10:33 PM0 commentsViews:

प्रणाली कापसे, मुंबई – 17 मे : जशी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ येवू लागलीय तशी काही पक्षांची एकमेकांशी जवळीक वाढू लागलीय. अशीच जवळीक गेल्या काही दिवसात मनसे-भाजपमध्ये दिसून येवू लागली आहे. त्यात राज ठाकरेंच्या मोदींशी फोनवरुन झालेल्या चर्चेनं आणि राज ठाकरेंना दिल्लीला येण्याच्या मिळालेल्या निमंत्रणानं वातावरण आणखीनचं तापलंय. या जवळकीचा या दोन्ही पक्षांना काही फायदा होईल की हा सगळा प्रकार फक्त शिवसेनेला डिवचण्यासाठी केला जातोय अशी चर्चा सध्या मुंबईत रंगू लागलीय.raj modi+_3

तब्बल चार वषांर्नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला. हे वाक्यच अनेकांच्या भुवया उंचावून गेलंय. मुंबईत येत्या सहा महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुका होऊ घातल्याय. त्यात सत्ताधारी सेना-भाजपंच सारखंच वाजतंय. अशात भाजपनं मनसेला जवळ करणं म्हणजे सेनेला डिवचण्यासारखं आहे.

सेनेला डिवचण्यासाठी मनसेला हवा देणं हा प्रकार काही पहिल्यांदा घडत नाहीये. यापूर्वी ही 2012च्या मुंबईच्या निवडणूकीत काँग्रेसनं मनसेला हवा दिली होती, इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीपूर्वी ही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज ठाकरेंना टोल या मुद्यावर चर्चा करण्यासाठी वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं. यावेळी फक्त मुद्दा आणि सत्ताधारी पक्ष बदललाय. टोल ऐवजी नीटची परीक्षा आणि काँग्रेस ऐवजी भाजपं…हाच काय तो फरक…पण सेनेच्या या भळभळणार्‍या जखमेवर मीठ चोळण्या प्रकार कायमच होत राहिलाय. आता प्रश्न फक्त इतकाच की या सगळ्या प्रकाराचा फायदा मनसे भाजपला होतो की सेनेला…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा