स्मशान कर्मचारी जाणार संपावर

March 27, 2010 9:45 AM0 commentsViews: 31

27 मार्चयेत्या 1 एप्रिलपासून मुंबईच्या अनेक स्मशानात महापालिकेचे कर्मचारी तुम्हाला दिसणार नाहीत. त्यामुळे पार्थिव घेऊन आलेल्या लोकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. याला जबाबदार आहे बीएमसी. स्मशानात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना होणार्‍या गैरसोयीमुळे संपावर जाण्याचा निर्णय या कर्मचार्‍यांनी घेतला आहे.स्मशानात काम करण्यासाठी चोवीस तासात तीन लेबर असणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात लेबर आहेत दोन. त्यामुळे प्रत्येकाला रोज दोन शिफ्टमध्ये काम कराव लागते.स्मशानात एका शिफ्टला चार माणसे काम करतात लेबर, भट्टीचालक, इलेक्ट्रिशियन, आणि डेथ रजिस्ट्रेशन कारकून. पण गेल्या पाच वर्षांपासून 200 लेबर, 8 भट्टीचालक, 30 डेथ रजिस्ट्रेशन कारकून, 4 इलेक्ट्रिशियनच्या जागा रिकाम्या आहेत.स्मशानात काम करणारा महापालिकेचा कर्मचारी आधीच त्रासलेला असतो. त्यातच ओव्हरटाईममुळे काम करणे कठीण होऊन जाते.रिकाम्या जागा भरण्याची अनेकदा निवेदने देऊनही उपयोग होत नसल्याने आता कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उसले आहे. 1 एप्रलपासून संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.1 एप्रिल उजाडायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही अशा संवेदनशील विषयावर आयुक्तांनी भरतीची साधी जाहिरातही दिलेली नाही. त्यामुळे हा विषय चिघळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

close