सोनू निगमवर आली भीक मागण्याची वेळ पण…

May 18, 2016 1:03 PM0 commentsViews:

18 मे : गेली कित्येक दशकं आपल्या सुमधुर आवाजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या सोनू निगमवर भीक मागण्याची वेळ आली…हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल…पण दचकू नका…सोनूसोबत असं खरंच घडलं पण ते एक सोशल एक्टिव्हिटीसाठी…’खोजता क्या हैं ? खुशिया यंही है !’ असा संदेश देण्यासाठी सोनूनं म्हातार्‍याचा वेश धारण करून मुंबईच्या रस्त्यांच्या कडेला फुटपाथवर बसून स्वतःचीच गाणी गायली. लोक त्याचं गाणं ऐकायला थांबले, पण त्याला कोणी ओळखलं नाही. एवढंच नाहीतर त्याने 12 रुपयांची कमाईही केली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

सोनू निगम हा प्रसिद्ध गायक असल्यामुळे त्याची अशी दशा बघून लोक चकीत झाले. पांढरे केस, मळालेले कपडे, डोळ्यांवर काळा चश्मा, हातात हारमोनियम… अशा अवस्थेत तो मुंबईच्या फूटपाथवरील एका झाडाखाली बसून भीक मागत असताना दिसला. आहे ना खूप चकीत होणारी गोष्ट… पण हे खरंच आहे.. असा एक प्रयोग करत असताना बिईंग इंडियनच्या वेबसाईटने हा व्हिडिओ शेअर केलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांनी सोनू निगमला अजिबात ओळखलं नाही. या व्हिडिओमध्ये सोनू ‘कल हो ना हो’ हे गाणे गात असताना दिसत आहे. या व्हिडिओचं नाव ‘द रोडसाइड उस्तामद’ असं आहे. विशेष म्हणजे, सोनू जेव्हा गाणं गात होता तेव्हा लोकांची एकच गर्दी झाली होती. त्या गर्दीत एका तरुणाने सोनूचं गाणं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं. आणि जेव्हा गाणं संपलं तेव्हा त्या तरुणाने मोठ्या अदबीने ‘बाबा काही खालं का ?’ अशी विचारणा करत 12 रुपयेही दिले. सोनूने हे 12 रुपये जपून ठेवत त्याची फोटो फ्रेम केलीये आणि ती आपल्या ऑफिसमध्ये लावली आहे. हे बारा रुपये माझ्यासाठी लाखो रुपये आहे अशी भावना सोनूने व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा