जळगावात 132 विनापरवाना मोबाईल टॉवर

March 27, 2010 9:58 AM0 commentsViews: 9

सीटिझन जर्नालिस्ट किशोर पाटील, जळगाव27 मार्चआजकाल कोणत्याही शहरात फिरताना सहज दिसणारी एक गोष्ट म्हणजे मोबाईल कंपन्यांचे टॉवर. या टॉवर्सच्या माध्यमातून मोबाईल कंपन्या लाखो रूपये कमावतात. जळगावातही असे 133 टॉवर्स आहेत. पण विशेष म्हणजे यातील फक्त एकाच टॉवर्सला परवानगी आहे. याबाबत बिल्डर्स आणि मोबाईल कंपन्यांचे संगनमत असल्याचे दिसून येते.मनपा प्रशासन आणि रहिवासी मात्र याबाबत अंधारातच आहेत. या टॉवर्समुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. आकाशात फिरणारे पक्षी गायब झाले आहेत. याबाबत आता नागरिक जागरूक झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने आता या मोबाईल कंपन्यांकडून दंडासहित रक्कम वसूल करण्याची तयारी चालवली आहे.

close