हाच तो ‘सैराट’मधला इनामदारवाडा !

May 18, 2016 2:16 PM0 commentsViews:

मधुकर गलांडे, इंदापूर – 18 मे : उजनी धरणाच्या बॅकवॉटर मधला कुगावचा इनामदारवाडा सैराट सिनेमात तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल…पण तो वाडा प्रत्यक्षात नेमका कसा दिसतो…याची उत्सुकता तुम्हालाही नक्कीच लागली असेल…म्हणूनच हा खास इतिहासकालीन इनामदारवाड्याचा स्पेशल रिपोर्ट …

ujani_sairatसैराट सिनेमात दिसणारा कुगावचा इनामदारवाडा….प्रत्यक्षातही तितकाच विलोभणीय आणि सुंदर दिसतो…उजनी धरण बर्‍यापैकी आटल्याने….लोकांना आता इथं जाणं सहज शक्य झालंय…धरण आटल्यावर इथून विस्थापित झालेले लोक स्मृतिंना उजाळा देण्यासाठी आवर्जून इथं येत असतात. यावर्षी मात्र, सैराट सिनेमात या ऐतिहासिक वाड्याचं चित्रीकरण काय दाखवलं आणि इथं पर्यटकांची गर्दी आणखीनच वाढू लागलीय.

कुगावच्या इनामदारांचा चारशे वर्षांपूर्वीचा आहे..चार एकरात विस्तारलेल्या या वाड्याचे चारही बुरुज आजही शाबूत आहेत…इथले अंबार, भुयारीमार्ग, बारव आजही इथं जसेच्या तसे बघायला मिळतात वांगीचे अंबाबाईचे प्राचीन मंदिर आणि इंदापूर तालुक्यातील पळसदेव इथलं पळसनाथचे हेमाडपंती मंदिर गेली पस्तीत वर्षे पाण्याखाली राहूनही शाबूत आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यानं इथल्या बोटचालकालाही आता सुगीचे दिवस आलेत.

सैराट सिनेमातलं चित्रीकरणही या परिसरात झालंय. म्हणूनच इतकी वर्षे दुर्लक्षित असलेली ही ऐतिहासिक वास्तू पुन्हा चर्चेत आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा