अंदमान-निकोबारमध्ये मान्सून, बळीराजाला लवकरच दिलासा

May 18, 2016 4:38 PM0 commentsViews:

rain_2401333f18 मे :  दुष्काळाने होरपळणार्‍या जनतेला अखेर दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून अंदमान-निकोबार बेटावर दाखल झाला आहे. यंदा मान्सूनचे आगमन 2 दिवस लवकर झाले असून तो दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा पुणे वेधशाळेनं केली आहे.

थोड्याच दिवसात मान्सून दक्षिण भारतात सक्रिय होणार असून तो हळूहळू उत्तरेच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होईल. 7 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये आणि त्यानंतर 7 दिवसांत म्हणजेच 15 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.

यंदा सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. लागोपाठ दोन वर्षे अपुर्‍या पावसामुळे शेतीवर आलेले दुष्काळाचे संकट पाहता हा अंदाज शेतकर्‍यांसाठी निश्चितच दिलासादायक आहे. तसंच उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा