सत्येंद्र दुबे हत्या प्रकरणी तिघांना जन्मठेप

March 27, 2010 10:39 AM0 commentsViews: 2

27 मार्चबिहारमधील सत्येंद्र दुबे हत्या प्रकरणी पाटण्यातील विशेष सीबीआय कोर्टाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मंटु कुमार, उदय कुमार आणि पिंकू दास अशी या तिघांची नावे आहेत. कोर्टाने त्यांना 22 मार्चला दोषी ठरवले होते. 2003 मध्ये पंतप्रधान सुवर्ण चतुष्कोन योजनेतील भ्रष्टाचार सत्येंद्र दुबे या इंजीनिअरने उघडकीस आणली होती. दुबे यांनी याबाबत त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना थेट पत्र लिहिले होते. त्यानंतर त्यांची हत्या झाली होती.

close