आणखी दोन वर्षे तरी नीट नको, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

May 18, 2016 9:52 PM0 commentsViews:

 CM and modio213

18 मे : सीईटी सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा आणखी दोन वर्षे तरी नीट नको, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज (बुधवारी) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.

नीट परिक्षेसंदर्भात केंद्रानं हस्तक्षेत करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. सीईटी वगळली जाईल, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असं आश्वासन मोदी यांनी त्यांना दिलं. 80 टक्के मुलांचा अभ्यासक्रम वेगळा आहे. ग्रामीण भागातील मुलांचे नुकसान होईल. यासाठीची पुस्तकं उपलब्ध नाहीत असे मुद्देही फडणवीस त्यांनी पंतप्रधान मोदींसमोर मांडलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा