‘अर्थ अवर’मध्ये सहभागी व्हा!

March 27, 2010 10:54 AM0 commentsViews: 5

जुही चौधरी, मुश्ताक खान 27 मार्च आपल्या घरातील गरजेची नसलेली विद्युत उपकरणे एका तासासाठी बंद ठेवण्याचा आजचा दिवस आहे. आज रात्री साडे आठ वाजता देशभरात 'अर्थ अवर' साजरा करण्यात येणार आहे.स्वत: मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सरकारी कार्यालये तसेच खाजगी कंपन्याही एक तासासाठी लाईट्स बंद ठेवणार आहेत.बदलत्या वातावरणाबद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी WWFतर्फे us 'अर्थ अवर'चे आयोजन करण्यात येते. आज रात्री साडेआठ ते साडे नऊ वाजेपर्यंत देशभरातील 50 लाख नागरिक आपल्या घरातील लाईट्स बंद करतील. आणि पृथ्वीवरील पर्यावरणाला वाचवण्यासाठी हातभार लावतील.मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ही मोहीम भारतात पहिल्यांदा 2009 साली राबवण्यात आली. गेल्या वर्षी एका तासात मुंबईत 200 मेगावॅट वीजेची बचत करण्यात आली. दिल्लीच्या कुतुब मिनार, लाल किल्ला तर मुंबईतील सीएसटी, एअर इंडिया बिल्डिंग आणि रिझर्व बँकेनेही सक्रिय सहभाग घेतला होता. यावेळी कॉर्पारेट कंपन्याही या उपक्रमात सहभागी होणार आहेत.आज फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील लाईट्स बंद करण्यात येणार आहेत. तेव्हा आज रात्री तुम्हीही आपले लाईट्स बंद करायला विसरू नका.

close