पश्चिम बंगाल भ्रष्टाचारमुक्त असल्याचा गर्व – ममता बॅनर्जी

May 19, 2016 4:20 PM0 commentsViews:

mamta_didi new

19 मे : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मिळालेला विजय हा सर्वसामान्य जनतेने मिळवून दिल्याचे सांगत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर प. बंगाल हे राज्य भ्रष्टाचारमुक्त राज्य असल्याचा गर्व वाटत असल्याचंही त्या म्हणाल्या.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागांवर यश मिळणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन प. बंगालमधील जनतेचे आभार व्यक्त केले.

राज्यात जनतेची दिशाभूल करण्याचा आणि त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न झाला. पण जनतेने शांततेत मतदान केलं. तसंच पश्चिम बंगाल हे देशातील भ्रष्टाचारमुक्त राज्य असल्याचा मला गर्व वाटतो, असा दावा देखील ममता बॅनर्जी यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा