जनतेचा कौल आम्ही विनम्रतेनं स्विकारतो – सोनिया गांधी

May 19, 2016 8:33 PM0 commentsViews:

sonia gandhi new

19 मे :  तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीच्या जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम या चारही राज्यांत काँग्रेसला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यापैकी केरळ आणि आसाममध्ये काँग्रेसने सत्ता गमावली आहे. या पार्श्वभूमीवर, या राज्यांमध्ये पराभव का झाला त्याच्या कारणांचा शोध घेण्यात येईल आणि पुन्हा एकदा या राज्यातील नागरिकांच्या सेवेमध्ये आम्ही सर्वजण जोमाने उतरू, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर पुडुचेरीमधल्या जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा