सुमन कल्याणपूर यांना लता मंगेशकर पुरस्कार

March 27, 2010 11:23 AM0 commentsViews: 14

27 मार्चज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सुमनताईंना हा पुरस्कार देण्यात आला.राज्यसरकारतर्फे गायन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणार्‍यांना हा पुरस्कार देण्यात येतो. राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात त्यांना हा पुरस्कार प्रदान केल्याने पुरस्काराची उंची वाढल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, सांस्कृतिक खात्याच्या राज्यमंत्री फौजिया खान उपस्थित होत्या.

close