अंदमानमध्ये धो धो पाऊस, लवकरच मान्सूनची महाराष्ट्राकडे कूच

May 20, 2016 9:06 AM0 commentsViews:

andaman420 एप्रिल : अंदमान निकोबारमध्ये मान्सूननं जोरदार एंट्री केलीये. गेल्या दोन दिवसांपासून या बेटांवर धो धो पाऊस बरसतोय. त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.

मान्सूनसाठी अंदमान हे देशाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातं. अंदमानमध्ये होणारा सुर्योदय आणि सुर्यास्त टिपण्यासाठी शेकडो पर्यटक गर्दी करतात, तशीच गर्दी या बेटांवर मान्सून दाखल झाल्यानंतर होते. अंदमानमधलं सेल्यूलर जेल, रॉस आयलंड, मॉरीना बिच, शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. दीर्घ प्रतिक्षेनंतर दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे अंदमानमधल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. हा मान्सून महाराष्ट्रासह देशभरात पाण्याच्या सरी घेऊन लवकर पोहचू दे अशी प्रार्थना नागरिकांनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा