निलेश राणे आज पोलिसांसमोर हजर होणार

May 20, 2016 9:17 AM0 commentsViews:

nilesh_rane33रत्नागिरी 20 मे : संदीप सावंत मारहाण प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांसमोर हजर होणार आहेत. चिपळूण पोलीस ठाण्यात सकाळी 10 वाजता ते हजर राहतील आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करतील असं सांगण्यात आलंय.

निलेश राणेंनी स्वतःहून आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यानंतर पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतलाय.त्यानुसार आज त्यांना अटकही केली जाऊ शकते. मेळाव्याला हजर राहिला म्हणून निलेश राणे आणि त्यांच्या सहकार्यांनी तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक पूर्व जामीन टाळण्यासाठी निलेश राणेंनी कोर्टात धावाधाव केली होती पण अखेरीस राणेंनी कोर्टातून माघार घेतलीये. त्यामुळे कोर्टाने पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा