अखेर निलेश राणे पोलिसांना शरण

May 20, 2016 12:15 PM1 commentViews:

nilesh_raneचिपळूण – 20 मे : संदीप सावंत मारहाण प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आज (शुक्रवारी) सकाळी 10 वाजता चिपळूण पोलिसांना शरण आले. शरण आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केलीये. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आलंय. दुपारी त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत मेळाव्याला हजर राहिले नाही म्हणून निलेश राणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मारहाण केली. या प्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण अटकपूर्व जामिनीसाठी राणेंनी हायकोर्टात धाव घेतली. मात्र, निलेश राणे यांनी स्वतःहून आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला. कोर्टाने त्यांना पोलिसांना शरण येणाचे आदेश दिले. त्यानंतर आज निलेश राणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत पोलिसांना शरण आले. पोलिसांनी राणे यांना अटक केलीये. सध्या चिपळूणमध्ये काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले आहेत. त्यामुळे चिपळूणमध्ये सध्या कडक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Ganesh Agawane

    Asalech kahitari ghanerade kaam ekhadya BJP chya netyane kele asate tar IBN Lokmat walyani 15 diwas tari roj tech radgaan dakhaval asat. Aso, congress cha ant jawal aala aahe. All the best! Aani Nilesh Rane sarakhe mastiwaan lok to lavkarat lavkar aananar, he agadi khare. Tya bicharya Mr Sandip Sawant yanchi kaay chuk hoti? Are maramaryach karayachya aahet na tar mag aamachyashi bhida na, mag baghu.