पुन्हा पाईपलाइन फुटली

March 27, 2010 1:52 PM0 commentsViews: 2

27 मार्चमुंबईत पाइपलाइन फुटण्याचे सत्र सुरूच आहे. आजही वरळीत एक पाईपलाईन फुटली. वरळीतील ऍनी बेझंट रोडवर आज रस्त्याचे काम सुरू असताना ही पाइपलाइन फुटली. यामुळे मुंबईवरचे पाणीकपातीचे संकट अजूनच गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण भिवंडीमध्ये वळगावजवळ मुंबईला पाणी पुरवठा करणारी आणखी एक पाईपलाईन फुटली आहे. काही दिवसांपूर्वी याच पाईपलाईन शेजारची पाईपलाईन फुटली होती. त्यामुळे गुढी पाडव्याच्या दिवशीच मुंबईत अतिरिक्त 15 टक्के कपात करण्यात आली होती. आता याच पाईपलाईन शेजारी असलेली 73 इंची पाईपलाइन फुटली आहे.

close