मोहम्मद युसुफ रिटायर होणार?

March 27, 2010 2:26 PM0 commentsViews: 6

27 मार्चपाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद युसुफ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संबंधीची घोषणा सोमवारी होणार असल्याचेही बोलले जात आहे. युसुफ पाकिस्तान क्रिकेटमधून आपली निवृत्ती तिसर्‍यांदा घोषित करतोय. ऑस्ट्रेलियाच्या खराब दौर्‍यानंतर पीसीबीने त्याला दिलेली वागणूक आणि शिक्षा यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे समजते. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर सगळ्या मॅच हरल्यामुळे युसुफ आणि युनुस खानवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. याशिवय युसुफवर टीममध्ये भांडणे लावणे आणि बेशिस्त पसरवल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.

close