प्रयोग लावा, अन्यथा तेंडुलकरांचं नाव काढा – मंगेश तेंडुलकर

May 20, 2016 4:29 PM0 commentsViews:

Mangesh tendulkar

पुणे – 20 मे : पुण्यातील सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील असलेल्या नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग लावा नाहीतर नाट्यगृहाला देण्यात आलेलं ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचं नाव काढून टाकावं, अशी मागणी विजय तेंडुलकर यांचे धाकटे भाऊ ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी केली. मंगेश तेंडुलकर यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांना पत्र लिहून याबाबतची मागणी केली आहे.

चारवर्षापुर्वी काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांच्या प्रयत्नाने सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील नाट्यगृहाला विजय तेंडुलकर याचं नाव देण्यात आलं. मात्र अवघ्या दोनच प्रयोगांनंतर तांत्रिक कारण देत प्रयोग बंद करण्यात आलं. त्यानंतर इतके वर्षं लोटूनही या नाट्यगृहात एकदाही कोणताही साधा नाटक आयोजित करण्यात आला नाही. नात्यगृहात नाटका ऐवजी दुसरेच कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतील तर मग त्याला ‘विजय तेंडुलकर नाट्यगृह’च नाव का दिल? असा सवाल मंगेश तेंडुलकर यांनी उपस्थित केला आहे.

नाट्यगृहाला विजय तेंडुलकर याचं नाव देण्यात याव अशी कोणतीही मागणी आम्ही केली नसताना नाट्यगृहाला विजय तेंडुलकर याचं नाव देण्यात आलं. त्याहीपेक्षा ते ज्येष्ठ श्रेष्ठ नाटककार होते. एका ज्येष्ठ नाटककाराच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग होऊ दिले जात नाहीत, ही बाब अयोग्य आहे. त्यामुळे या नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग करणे शक्य नसेल, तर विजय तेंडुलकर यांचं नाव काढून टाकण्यात यावं, अशी मागणी मंगेश तेंडुलकर यांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा