भुजबळांच्या जामीनावर 27 तारखेला सुनावणी

May 20, 2016 5:43 PM0 commentsViews:

bhujbal discharge

20 मे :  महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आता 27 मे रोजी सुनावणी होणार आहे. हायकोर्टाने 27 तारखेला भुजबळांचा मेडिकल रिपोर्ट सादरण्याचे आज आदेश दिले.

छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जाबाबत आता मेडिकल बोर्डाच्या अहवालानंतर हायकोर्ट सुनावणी घेणार आहे. छगन भुजबळ यांना 24 मे रोजी मेडिकल बोर्डासमोर हजर करा. या मेडिकल बोर्डामध्ये कमीत-कमी तीन तज्ज डॉक्टरांचा समावेश असावा. या बोर्डाची नेमणूक जेजे रुग्णालयाच्या डीनने करावी, असं निर्देश हायकोर्टाने दिलं. मेडिकल बोर्डाने 24 मे रोजी भुजबळ यांच्या सर्व आवश्यक तपासण्या केल्यानंतर सीलबंद स्वरुपात तपास अधिकार्‍याला तयार केलेला अहवाल द्यावा. यानंतर तपास अधिकार्‍याने भुजबळांचा तो मेडिकल रिपोर्ट हायकोर्टात 27 मे रोजी सादर करावा, असाही आदेश हायकोर्टाने दिला आहे. त्यानुसार हा रिपोर्ट हायकोर्टात सादर होताच 27 मे रोजीच भुजबळांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा